जनतेला याआधीच पाणी दिले असते तर तुम्हाला निवडणुक जिंकता आली असती – उदयनराजेंचा पवारांना टोला

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नीरा देवघर धरणाच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. माढाच्या लोकांना याआधीच पाणी दिले असते तर तुम्हाला माढाची निवडणुक जिंकता आली असती अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद करण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला, निवडणुकीच्या तोंडावर लोक येतात आणि माढातून निवडणूक लढवू म्हणतात. पण माढाच्या लोकांना याआधीच पाणी दिले असते तर तुम्हाला माढाची निवडणुक जिंकता आली असती अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता उदयनराजे यांनी केली आहे.

Loading...

विशेष म्हणजे, उदयनराजे यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला, स्वतःला भगीरथ म्हणवून घेणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना काहीच काम केले नाही. मंत्रीपदी असताना लाल दिव्याच्या गाडीचा वापर फक्त लोकांना हिणवण्यासाठी केला, त्यांना आता देवसुद्धा क्षमा करणार नाही अशी टीकाही त्यांनी केली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले