आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले

udyanraje

सातारा : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे आज उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत आता आमचा अंत पाहू नका असा सज्जड इशाराच राज्य सरकारला दिला आहे. आता आमचा अंत पाहू नका, दुसऱ्याचे काढून आम्हाला काहीही देऊ नका पण आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्या. लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही. अस उदयनराजे म्हणाले आहेत. तर इतरांना न्याय मग आमच्यावर अन्याय का ? असा सवाल करत उदयनराजे यांनी राज्य सरकारने कोर्टात ठाम भूमिका मांडावी असे आवाहन देखील राज्य सरकारला केले आहे.

दुसरीकडे यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रखडलेल्या मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा घणाघाती आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. तर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आरक्षणासाठी लढणं गरजेचं असल्याच मत देखील यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलून दाखवले.

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून कष्टकरी, सामान्यांच्या अडचणी, माथाडी कामगार यांच्या अडचणींवर काम केले जाणार आहे. तसचे या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रामुख्याने कुठल्याही राजकारणाचा हस्तक्षेप न होऊ देता मराठा आरक्षणाचा लढासुद्दा या प्रखरपणे लढला जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. उदयनराजे, आणि शिवेंद्रसिंहराजे फाऊंडेशन उद्धाटनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या