खासदार उदयनराजेंनी घेतली आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट

udayanraje

सातारा : सातारा नगरपालिकेच्या जासी जवळ येत आहे तशा निवडणूक निमित्ताने सध्या अनेक चर्चांना उधाण आलेले चित्र दिसत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरूची या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे.

या भेटीचे निमित्त होते नाशिक सुरगना येथे होणाऱ्या आपल्या मामाच्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्याचे त्यासाठी उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे याची भेट घेतल्याचे समजत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लग्नपत्रिका देऊन लग्नास येण्याची विनंती केली. आनेवाडी टोलनाक्याच्या वादानंतर प्रथमच खासदार उदयनराजे सुरूचीवर आल्यामुळे अनेकांना सुखद धक्का बसला.

खासदार उदयनराजे भोसले हे आज आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे निवासस्थान असलेल्या सुरुची बंगला येथे सुमारे सकाळी साडे अकराच्या सुमारास गेले. उदयनराजेंची गाडी सुरुची बंगला येथे जाताच हे दृष्य पाहणा-या नागरिकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते. नागरिकांची एक एक कामे त्यांच्याकडून केली जात होती. दरम्यान त्याचवेळेत उदयनराजेंची गाडी सुरुचीत येताच तेथील उपस्थित नागरिकही अंचबित झाले.

उदयनराजे हे गाडीतून उतरताच शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या हातात एक पत्रिका दिली. दोघांमध्ये थोडक्यात संवाद झाला आणि त्यानंतर उदयनराजे हे त्यांच्या दैनंदिन कामासाठी सुरुची बंगल्यातून बाहेर पडले.

दरम्यान नाशिक येथे असलेले नातेवाईकांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी गेले होते. ही भेट कौटुंबिक होती. या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे दोन्ही राजेंच्या निकटवर्तीयांनी नमूद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या