सातारा : आज शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्रात कोरोनाच भान ठेवून मात्र उत्साह कायम ठेवून छत्रपती शिवाजी महाराज कि जय…! ज्या घोषणांनी साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते साताऱ्यामध्ये छत्रपतींच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांनाच जाहीर आवाहन केलं आहे. यामध्ये सध्या विविध समाजांत निर्माण झालेली तेढ घातक असून शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं हे स्वराज्य नाही, असं देखील त्यांनी नमूद केलं. तसेच, फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, पण त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केली जात नाही, असं देखील उदयनराजे भोसले यांनी नमूद केलं आहे.
उदयनराजे यांनी सध्याच्या स्थितीवरून खंत व्यक्त करतानाच हात जोडून विनंती करत असल्याचं देखील म्हटलं आहे. ‘मन अत्यंत दु:खी झालंय. प्रत्येक जण आज शिवाजी महाराजांचं नाव घेतो. मग तो कोणताही पक्ष असो. पण जेव्हा त्यांचे विचार आचरणात आणण्याची वेळ येते, तेव्हा तसं काही पाहायला मिळत नाही. व्यक्तीकेंद्री विचार आचरणात आणले जातात,’ असं उदयनराजे म्हणाले.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर अंमलात आणले जाणार नसतील, तर या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आधीच वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण झाली आहे. सर्व जातीधर्मात आपले सगळ्यांचे मित्र आहेत. पण त्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झालेला जाणवतो. लोकांना हात जोडून विनंती करीन, मेहेरबानी करा. कोणत्याही विचाराला बळी न पडता एकत्र बंधुभावाने आपले पूर्वज राहात होते, तसंच आत्ताही आणि भविष्यातही प्रत्येकानं तसं राहायला हवं. हीच शिवाजी महाराजांची लोकशाहीची कल्पना होती,’ असं देखील उदयनराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
पहा व्हिडीओ –
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या ‘
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या अश्वारुढ स्मारकासमोर ३१ फुटी स्वराज्यगुढी
- ‘प्रशासन चालवताना आपण जनतेसाठी आहोत, हे लक्षात ठेवावं यासाठीच शिवस्वराज्य दिन’
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात’