fbpx

Video: गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोषच; खा सुप्रिया सुळेंनी केली मानकरांची पाठराखण

supriya sule

पुणे: everybody is innocent until proven guilty म्हणजेच जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती निर्दोषच असल्याच म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीपक मानकर यांची पाठराखण केली आहे. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी या प्रकरणातील अन्य पाच जणांना पोलसांकडून अटक करण्यात आली. मात्र,अद्याप मानकर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, सुप्रिया सुळे यांना याबद्दल विचारल असता त्यांनी सर्व माहिती घेवून पक्ष निर्णय घेणार असल्याच सांगितले आहे.

जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या केली होती. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काल अजित पवार यांनी देखील मानकर यांची पाठराखण केली होती. मानकर यांनी जगताप यांना व्यवसायासाठी मदत केलेली होती, तसेच जगताप यांच्याकडून आत्महत्या करण्याची धमकी देण्यात येत असल्याचे पत्र मानकर यांनी आधीच पोलिसांना दिल्याच अजित पवार म्हणाले होते.

काय आहे प्रकरण

मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप यांनी  2 जूनला  रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होत.

1 Comment

Click here to post a comment