fbpx

धनगर आरक्षणासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत आक्रमक पवित्रा

दिल्ली : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या.२०१४ च्या निवडणुकीत भाजपने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते.आता ते सरकारने पूर्ण करायला हवे, अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.१९६६ आणि १९७९ साली राज्य सरकारने पाठविलेला प्रस्ताव सरकारकडे आहे.या प्रस्तावाची त्वरित दखल घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करावे.धनगड व धनगर हे दोन्ही जातीसमुदाय एकच असून धनगड समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पण धनगर समाज यापासून वंचित आहे. असंही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.

गेली कित्तेक वर्ष धनगर आरक्षणाच घोंगड भिजत ठेवलेलंं आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप २०१४ च्या निवडणुकीत रान उठवत सत्तेवर आली.मात्र अजूनपर्यंत भाजपने आश्वासन पूर्ण केले नाही.आता २०१९ ची लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर य्रेऊन ठेपलेली आहे. सत्ताधारी भाजप धनगर आरक्षणाच्या बाबतीत आतातरी काही पावले उचलते का ते बघावे लागणार आहे.