‘फेम इंडिया’कडून खासदार सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित

supriya pawar sule

टीम महाराष्ट्र देशा- संसदेत जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शुक्रवारी उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झाले.

लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघात खासदारांनी केलेली कामे, अधिवेशन काळात उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रश्न मांडतानाचा प्रभावीपणा या आणि अशा विविध मुद्दय़ांवर आधारित फेम इंडिया आणि आशिया पोस्ट या दोन संस्थांनी सर्वेक्षण केले होते. त्यातून देशभरातील २५ खासदारांची निवड करण्यात आली आहे. यात संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून अव्वल ठरलेल्या सुप्रिया सुळे यांना प्रथम क्रमांकाचा नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला.