…आणि सुप्रिया सुळेंनी दिली प्रवाशांना लिफ्ट

पुणे: काल मध्यरात्रीपासून राज्य भरातील एसटी कामगारांनी सातवा वेतन आयोग लागू व्हावा तसेच इतर मागण्यासाठी संप पुकारला आहे. यामुळे येन दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वारगेट बस स्थानकावर आज खा. सुप्रिया सुळे यांनी सकाळी संपकरी कामगार आणि प्रवाशांची भेट घेतली.

दरम्यान, सर्वांची भेट घेऊन निघाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संपामुळे बस स्थानकावरच अडकून पडलेल्या प्रवाशांना चक्क आपल्या गाडीमधून लिफ्ट दिली आहे.