कर्जबुडव्यांना पाठीशी घालायचं आणि सामन्यांच्या पाकिटावर डल्ला; आता जनता हे सहन करणार नाही – सुप्रिया सुळे

Supriya-Sule

टीम महाराष्ट्र देशा: आजवर ज्या बँकिंगसेवा निशुल्क मिळत होत्या त्यांच्यासाठी आता शुल्क आकारले जाणार असल्याच दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रक्कम जमा करणे, रक्कम काढणे, मोबाइल क्रमांक बदलणे, केवायसीसाठी पत्ता बदलणे, नेटबँकिंग किंवा चेकबुक इत्यादी सेवांसाठी जादा शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे.

सरकारकडून एका बाजूला ऑनलाईन बँकिंगसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे अशाप्रकरे सामन्यांच्या खिशावर डल्ला मारला जात असल्याने यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ‘हे सरकार कर्ज कर्जबुडव्यांना पाठीशी घालायचं आणि ज्येष्ठ नागरिक, छोटे-मोठे दुकानदार, मध्यमवर्गीय यांच्या पाकिटावर हल्ला करायच काम करत आहे. मात्र सामान्य माणूस हे सहन करणार नसल्याची’ टीका केली आहे.