हे मुख्यमंत्री आहेत की शंकासूर ? – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. किसान मोर्चात ९५ टक्के शेतकरी नाहीत हे मुख्यमंत्र्यांच वक्तव्य असो वा शेतकऱ्यांच्या हातात पाट्या देऊन फोटो काढणे असो किंवा एमपीएससी आंदोलनास खासगी क्लासचालकांची फूस असल्याच वक्तव्य असो या सगळ्यांवरून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. हे मुख्यमंत्री आहेत की शंकासूर ? अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

“किसान मोर्चात ९५ टक्के शेतकरी आहेत की नाही याबाबत ते साशंक असतात. शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल यांना शंका, म्हणून ते हातात पाट्या देऊन फोटो काढतात. आता त्यांना एमपीएससी आंदोलनास खासगी क्लासचालकांची फूस असल्याची शंका आहे. हे. मुख्यमंत्री आहेत की शंकासूर ?” या आशयाच ट्विट सुप्रिया सुळे यांनी केल आहे.

दरम्यान, स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत विद्यार्थांनी ‘आक्रोश मोर्चा’ काढला होता. यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. या ‘आक्रोश मोर्चा’ आंदोलनात तरुणांसोबतच खाजगी क्लासेसचे लोकही सहभागी होते, असा आरोप करताना मुंबईत झालेल्या एमपीएससीच्या आंदोलनाला खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांची फूस असल्याची संशय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता.

Loading...