नगरमध्ये लॉकडाऊन न केल्यास… सुजय विखेंचा थेट इशारा

sujay vikhe

अहमदनगर : लॉकडाऊन न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील, असा थेट इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नगर शहरासह जिल्ह्यात सुरुवातीला दहा रुग्ण होते. ते आता हजाराच्यावर गेले आहेत. कोरोनाचा इतक्या झपाट्याने प्रसार होत आहे की परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठे तांडव निर्माण होऊ शकते. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझे असे मत आहे की, जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करावा. प्रशासनाने निर्णय न घेतल्यास यामुळे होणाऱ्या मृत्यूस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे जबाबदार राहतील. अस सुजय विखे म्हणाले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण खात्याने परवानगी दिली असून हे काम कोणत्याही परिस्थितीत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. या कामाच्या आड जे कोणी येईल? त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. आज नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार आणि लोकसभेला विखे यांचे प्रतिस्पर्धी असलेले संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते.

नगरच्या राजकारणाचा सुसंकृत किस्सा : ‘तोपर्यंत’ तरी सुजय विखे अन् संग्राम जगतापांचा याराना…

तर, नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तरी एकमेकांविरोधात प्रचार करणार नाही. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत संग्राम जगताप व आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाही. शेवटी नगर शहरातील प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असे सुजय विखे यांनी सांगितले आहे.

तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप आणि सुजय विखे हे एकमेकांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. तेव्हापासून नगरच्या या दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद होता. मात्र निदान नगरच्या विकासाच्या प्रश्नी तरी हे दोन्ही युवा नेते एकत्र आल्याने नगरच्या सुसंकृत राजकारणाचे दर्शन राज्याला पुन्हा झाले आहे.

जाणून घ्या ट्विटरवर सध्या #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड का होत आहे?