पार्थ पवार आले कि दुसरा कोणी पवार मला फरक पडत नाही – बारणे

पिंपरी : पार्थ पवार यांची ओळख अजित दादा पवार यांचा पुत्र म्हणून आहे, तर जनमानसातील काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला ओळखल जात. पार्थ यांना स्वत:ची ओळख करून देण्यासाठी बँनर लावावे लागतात म्हणत मावळ लोकसभेचे खा. श्रीरंग बारणे यांनी पार्थ अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पार्थ पवार आले कि दुसरा कोणी पवार मला फरक पडत नाही. मावळत पुन्हा एकदा मीच निवडून येणार असल्याचा विश्वास देखील बारणे यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पावर यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या परिवर्तन सभेत विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पार्थ यांना मावळातून उमेदवारी द्यावी हे बोलून दाखवले. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये राजकीय गोटात चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, याविषयी बोलताना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी खरमरीत शब्दात पार्थ पवार यांचा समाचार घेतला आहे. मला गेली 25 वर्षापासून सर्वसामन्यांतील काम करणारा म्हणून ओळखले जाते, त्यामुळे पार्थ पवार आले कि दुसरा कोणी पवार मला फरक पडत. मावळ मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून माझे नाव निश्चित करण्यात आले आहे. भविष्यात देखील मीच असणार आहे, माझी भीती वाटणारे विरोधक असा प्रचार करत असल्याची टीका श्रीरंग बारणे यांनी केली आहे.Loading…


Loading…

Loading...