हिंदुत्वाच्या मतांमध्ये होणारी विभागणी टाळण्यासाठी युती व्हायला पाहिजे : खा.आढळराव पाटील

टीम महाराष्ट्र देशा- हिंदुत्वाच्या मतांमध्ये विभागणी व्हायला नको म्हणून भाजपसोबत युती व्हायला पाहिजे. माझ्या मतदारसंघात युती झाली नाही तरी काही फरक पडत नाही. माझा विजय निश्चित असून केवळ शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या खासदारांची देखील मनापासून इच्छा असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

महाराष्ट्र देशाच्या ‘गेम चेंजर’ या विशेष कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हजेरी लावली.गेल्या पाच वर्षात भाजपकडून जी वागणूक दिली त्याबद्दल उघडपणे नाराजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. मात्र उद्या जर शिवसैनिकांना सन्मानाने वागणूक दिली जात असेल तर युती करायला हरकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. गेली १५ वर्षे माझ्या मतदार संघात माझे सातत्याने दौरे सुरु असतात. मी केलेल्या विकासकामांमुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा देखील त्यांनी केला. युती न झाल्यास केवळ शिवसेनेचं नव्हे तर भाजपचे देखील मोठं नुकसान होईल अशी शक्यता त्यांनी वर्तविली.

याच मुलाखतीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतंं यावर त्यांनी सविस्तरपणे मते मांडली. याशिवाय शिरूर मधून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी माघार का घेतली ?विमानतळ,रेल्वे,बैलगाडा शर्यत हे प्रश्न अद्याप का प्रलंबित आहेत ?विरोधकांकडे मुद्दे नसल्याने खोटे आरोप केले जात आहेत का ? आढळराव पाटील विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांच्या आव्हानाकडे कसं पाहत आहेत ?या सर्व प्रश्नांची बेधडकपणे उत्तरे दिली.

‘गेम चेंजर’ शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची विशेष मुलाखत