शिरूरमधून अजित पवारांनी माघार का घेतली? आढळराव पाटील म्हणतात …

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माघार घेतली आहे. याच मुद्द्याबाबत बोलताना शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पवार यांना टोला लगावला आहे.

अजित पवारांनी माघार का घेतली हे माहित नाही मात्र मी त्यांना निवडणूक लढविण्याच्या वक्तव्यावर ठाम रहा असं आवाहन त्यावेळी देखील केलं होत आणि मी आज देखील त्यांना तेच आवाहन करत असल्याचा पुनरुच्चार महाराष्ट्र देशाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार ?

पवार साहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला; तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. मी येथून उमेदवारी फॉर्म भरला तर मीच निवडून येईल, नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, , असे वक्तव्य करून अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात धुरळा उडवून दिला होता.

दरम्यान,याच मुलाखतीमध्ये गेल्या पाच वर्षात भाजपकडून जी वागणूक दिली त्याबद्दल उघडपणे नाराजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. मात्र उद्या जर शिवसैनिकांना सन्मानाने वागणूक दिली जात असेल तर युती करायला हरकत नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. गेली १५ वर्षे माझ्या मतदार संघात माझे सातत्याने दौरे सुरु असतात. मी केलेल्या विकासकामांमुळे माझा विजय निश्चित आहे असा दावा देखील त्यांनी केला. युती न झाल्यास केवळ शिवसेनेचं नव्हे तर भाजपचे देखील मोठं नुकसान होईल अशी शक्यता त्यांनी वर्तविली.

याच मुलाखतीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतंं यावर त्यांनी सविस्तरपणे मते मांडली. याशिवाय शिरूर मधून निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी माघार का घेतली ?विमानतळ,रेल्वे,बैलगाडा शर्यत हे प्रश्न अद्याप का प्रलंबित आहेत ?विरोधकांकडे मुद्दे नसल्याने खोटे आरोप केले जात आहेत का ? आढळराव पाटील विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांच्या आव्हानाकडे कसं पाहत आहेत ?या सर्व प्रश्नांची बेधडकपणे उत्तरे दिली.

‘गेम चेंजर’ शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची विशेष मुलाखत

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत