नागपूरमधील हल्लाबोल मोर्चाचे करणार शरद पवार नेतृत्व

राष्ट्रवादीकडून शेवटच्या हल्लाबोल मोर्चाची जय्यत तयारी

नाशिक : शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांसाठी १२ डिसेंबर रोजी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाने नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.

खोटी आश्वासने देवून भाजप-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्य जनतेला फसविले आहे. या फसव्या युती सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यवतमाळ ते नागपूर अशी हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येत आहे. या प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार, विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष आ.भास्कर जाधव, माजी मंत्री आ.जयंत पाटील, माजी मंत्री आ.शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व नेते सहभागी झालेले आहेत. १२ दिवसांच्या या हल्लाबोल पदयात्रेत नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कते देखील सहभागी झाले आहे. यात जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आ.जयवंतराव जाधव, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, सोमनाथ खातळे, प्रेरणा बलकवडे, नंदन भास्करे, रत्नाकर गायकवाड, संजय खैरनार आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. खा.शरद पवार यांच्या नेतृत्वाने दि.१२ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर होणारा मोर्चा आणि त्यानंतर होणाऱ्या सभेसाठी नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते देखील आज नागपूरकडे रवाना झाले आहे.

You might also like
Comments
Loading...