जर हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहूनचं दाखव, संजयकाकांचे पडळकरांना आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : आमच्यापासून काल बाजूला गेलेली लोकं आमच्यावर आज बेताल वक्तव्य करत आहेत, जर तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहूनचं दाखव अस खूल आव्हान सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना दिले आहे.

मिरज येथे निवडणुकीसंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात संजयकाका आणि गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.जिल्ह्यातील नेत्यांनीच जिल्ह्यातील पालकमंत्री होऊ दिला नाही, असा आरोप करत पडळकर यांनी संजयकाकांना कोपरखळी मारली.

दरम्यान, संजयकाकांनी गेल्या काही काळात सिंचनासह अनेक प्रश्न सोडविण्यासाठी ताकद लावली आहे, असंही पडळकरांनी त्यावेळी सांगितलं. मात्र या कार्यक्रमात या दोघांमध्ये बरीच बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.Loading…
Loading...