बापट अस्सलं पुणेकर असून ते जे बोलतात ते खरे – संजय राऊत

sanjay-raut

नाशिक, १० जानेवारी (हिं.स) : अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे अस्सलं पुणेकर असून जुने व ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीही खोटं बोलत नाहीत. त्यांच्या जे पोटात होतं, ते ओठांवर आलं आहे. त्यामुळे सरकारबद्दल त्यांनी केलेली टिप्पणी खरी आहे,’ असे सांगत खा. संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. कोरेगाव भीमा प्रकरणी जातीयवादात महाराष्ट्रात फाटला असल्याचे त्यांनी सांगत हे राज्याचा हिताचे नसल्याचे राऊत यांनी सांगितले. नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बोलत होते.

वर्षभरानंतर हे सरकार बदलणार आहे. त्यामुळं जे मागायचंय ते आताच मागून घ्या, असं वक्तव्य भाजप सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात शेतक-यांना संबोधित करताना म्हटलं होतं. या वक्तव्याचा आधार घेत राऊत यांनी बापट यांना जोरदार टोला लगावला. ते कधीही खोटं बोलत नाहीत. त्यांच्या पोटात होतं, ते ओठांवर आलं आहे, असं ते म्हणाले. कोरेगाव भीमा प्रकरणामुळे राज्यात जातीयवाद अगदी टोकाला गेला आहे. वाढता जातीयवाद धोकादायक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुंबईतील आगीच्या घटनेवर भाष्य करतांना ते म्हणाले, वाढत्या आगीच्या घटनांना लोकसंख्येची वाढ कारणीभूत आहे. कोरेगांव भीमा घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करणं चुकीचं आहे. महाराष्ट्र जातीपातीत विभागला जात आहे. हे धोकादायक आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Loading...

कोरेगाव भीमा प्रकरण हाताळण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य करण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं. शेतक-यांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष सत्र आयोजनाची पी. साईनाथ यांची मागणी रास्त असून तीन तलाखच्या विषयावर विशेष सत्र बोलावले जाऊ शकते तर मग शेतकयांच्या प्रश्नावर विशेष सत्राचे आयोजन का केले जाऊ नये? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. कृषी खात्याचे वेगळे अर्थसंकल्प असावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.कोरगाव भीमा प्रकरणाची चोैकशी करा कोरेगाव भीमा वादाविषयी कारवाईची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यामध्ये पुण्याच्या एल्गार परिषदेत उमर खालीदला कोणी बोलावले? याचीही चौकशी व्हावी, असे सांगत या एल्गार परिषदेतच या वादाची ठिणगी पेटली असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, यामध्ये राज्य सरकारची जबाबदारी वाढते. कारण या परिषदेतच कोरेगाव भीमा वादाची ठिणगी पडली. उमर खालीदवर ‘जेएनयु’ प्रकरणात देशद्रोहाचा खटला दाखल आहे. त्याला भारत एकसंघ राहू नये. भारताचे तुकडे व्हावे असे वाटते. त्याला एल्गार परिषदेला बोलावले. त्याच परिषदेत या वादाची ठिणगी पडल्याचेही ते म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार