‘पहिल्यांदा लोकसभेचे आणि माझ्या उमेदवारीचे तरी ‘लगीन’ होऊ द्या ; नंतर पुढचे पुढे पाहू’

सांगली : मी सांगलीतून राजकारणाची सुरुवात केली असली तरी गेल्या 1998 पासून तासगावातूनच लढत आलो आहे. मला तेथील लोकांनी मोठे केले, त्यामुळे तेथे लक्ष दिले आहे. पण मी लोकसभेसाठीच लढणार आहे. विधानसभेत जाण्यात मला इंटरेस्ट नाही. त्यामुळे तासगावमधून विधानसभेच नंतर, पहिल्यांदा लोकसभेचे आणि माझ्या उमेदवारीचे तरी ‘लगीन’ होऊ द्या; नंतर पुढचे पुढे पाहू. अस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी स्पष्ट केल आहे.

दरम्यान , तासगावमध्ये संजय पाटील यांनी आपल लक्ष केंद्रित केल्याने संजय पाटील नक्की लोकसभा कि विधानसभा लढवणार यावर संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, संजयकाका यांनी आता आपण लोकसभाच लढवणार असल्याच स्पष्ट केल्यानी संभ्रम दूर झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=523s

तर माझ्या विरोधात भाजपमध्ये संशयास्पद वातावरण केले जात आहे. अशा कुरघोड्या करणार्यांच्या खोलात जाऊन माहिती घेऊ, असा इशारा सुद्धा त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला आहे. पण गोपीचंद पडळकर यांच्या नाराजीवर बोलण संजयकाकांनी टाळल आहे.