खमक्या नेतृत्वाच्या अभावामुळेच पुण्याच्या विकासाला गती नाही – खा काकडे

पुणे : व्यावसायिक व्यक्तीला प्रोफेशनलपणे काम करण्याची व कमिटमेंट पाळण्याची सवय असते. त्यामुळे व्यावसायिक व्यक्ती राजकारणात आली तर, जुमलेबाजी न करता प्रोफेशनली काम करण्यावर त्यांचा भर असतो. सध्या पुणे महापालिकेत सावळा गोंधळ सुरु आहे. खमक्या नेतृत्व नसल्याने आणि कामांचे नियोजन होत नसल्याने पुण्यातील विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याची टीका खा संजय काकडे यांनी केली आहे. काकडे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून काकडे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय भेटीगाठीस सुरुवात केली आहे. त्याचाच भाग आज वडगावशेरी मतदारसंघ पिंजून काढला आहे.

खासदार काकडे यांनी आज वडगावशेरी मतदारसंघात सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी नगररोड कट्ट्यावर मान्यवरांशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. काकडे यांच्या या दौऱ्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात वडगावशेरी मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

नगररोड कट्ट्यावर मनसेचे बाबु वागस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील टिंगरे, भाजपचे नगरसेवक राहुल भंडारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे, भीमराव गलांडे, सुनील मलके, नितीन भुजबळ, नानासाहेब नलावडे, दयानंद अडागळे, रमेश सकट, राजकुमार ढाकणे, जितेंद्र भोसले, मोहन शिंदे, रमेश आढाव आदी मान्यवर उपस्थित होते

पुण्याच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढविणार असून निवडून आल्यानंतर मी जनतेला उत्तरदायी असेल, खासदार झाल्यानंतर एका वर्षात पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल. मध्यवर्ती पेठांसह सर्व उपनगरांना मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुरेसा पाणीपुरवठा शक्य आहे. फक्त त्यासाठी नियोजन करुन निर्णय घेण्याची गरज आहे, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...