व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड

टीम महाराष्ट्र देशा : बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांना काल रात्री (२५ फेब्रुवारी) अटक केली होती. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

संजय काकडे हे राज्यसभेवरील भाजपचे खासदार आहेत. काकडे आणि भोसले एकमेकांचे व्याही आहेत. काकडेंचे दुसरे व्याहीसुद्धा राजकीय क्षेत्रातील आहेत. संजय काकडे यांची कन्या कोमल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सून आहे. काकडे-देशमुख कुटुंबाच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Loading...

खासदार संजय काकडे पुणे पोलिस आयुक्तालयात गेले होते. शिवाजी भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे काकडेंचे व्याही आहेत. त्या पार्श्वभूमीवर काकडेंनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह १६ जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण ३०० कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित २२२ कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं