‘तो’ अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या- काकडे

sanjay kakde and sharad pawar

पुणे : “1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी वाजपेयींनी स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. पवार केंद्रीय मंत्री असताना, तो अहवाल आला. त्यावेळेच तो अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या.”, असे म्हणत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंनी पवारांवर निशाणा साधला.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार खासदार संजय काकडेंनी पवारांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली .

Loading...

नेमकं काय म्हणाले संजय काकडे
शरद पवार हे विरोधी पक्षाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे वठवतात. जेव्हा जेव्हा ते विरोधी पक्षात राहिलेत, तेव्हा तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचं खूप चंगल्या प्रकारे काम केले आहे . 1985-86 साली शरद जोशींनी हमीभावासाठी मोठं आंदोलन उभारलं होतं. देशभर त्यावरुन रान पेटलं होतं. त्यानंतरही काँग्रेसने काही केले नाही. मग अटल बिहारी वाजपेयींनी स्वामिनाथन आयोगाची स्थापना केली. पवार केंद्रीय मंत्री असताना, तो अहवाल आला. त्यावेळेच तो अहवाल मान्य झाला असता, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल आल्यानंतरही 8 वर्षे गेली. मात्र अखेर मोदी सरकारने अहवालातील काही गोष्टी घेत, दीडपट हमीभाव जाहीर केला.पवारांनी मोदींचे अभिनंदन करण्याऐवजी ते लोकांची दिशाभूल करत आहेत. 36 हजार कोटींची कर्जमाफी सरकारने जाहीर केली आहे. काही आकडेवारी आणि टेक्निकल गोष्टी असतात. पण येत्या 6 ते 8 महिन्यात पूर्णपणे कर्जमाफी होईल. फसव्या गोष्टी राज्य सरकार करणार नाही

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले