उदयनराजे नव्हे तर मलाच मिळणार भाजपची उमेदवारी,संजय काकडे यांना गाढा विश्वास

पुणे : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा एक-एक उमेदवार निवडून येऊ शकतो.सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडून राज्यसभेचे तीन खासदार निवडून जाऊ शकतात. यातील दोन जागांवर उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झाल असून तिसऱ्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

मी स्वतः भारतीय जनता पक्षाचे दीड लाख सभासद नोंदवले आहेत.2019 ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश मी पाळले त्यामुळे राज्यसभा मलाच मिळेल.पण, अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे व्यक्तव्य भाजपचे संजय काकडे यांनी काल पत्रकार परिषदेत केले.

Loading...

संजय काकडे यांना उदयनराजेंची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा असल्याचे विचारल्यावर काकडे यांनी उदयनराजेंचे भाजपसाठी काय योगदान आहे, मी पक्षाच्या वाढीसाठी जास्त प्रयत्न केले आहेत,असा सवाल उपस्थित केला. तर उदयन राजे हे वंशज असले तर आम्ही सुद्धा सुभेदार आहोत ’ असेही काकडे म्हणाले.

काकडे म्हणाले, उदयनराजेंच पक्षाला अस काही योगदान दिले नाही.ते भाजपमध्ये आले, निवडणुकीला उभे राहिले आणि पडले.त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार होईल, असे वाटत नाही. उदयनराजे फक्त भोसले आहेत म्हणून ते सरस आहेत, असं होऊ शकत नाही.

उदयनराजेंना 80 वर्षांच्या व्यक्तीने पाडलं जो दहा वर्षं राजकारणात नव्हता. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मोदी आणि शहा. मी त्यांना म्हटलं की तुम्हीच माझ्या वतीनं मोदी, शहांना भेटा. उदयनराजे भोसले आहेत म्हणून उमेदवार होऊ शकत नाही. तसा निकष लावला तर आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात