fbpx

विधानसभेच्या २५ जागांच आमिष देत राष्ट्रवादीची राज ठाकरेंना सुपारी- खा संजय काकडे

sanjay kakade1

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कॉंग्रेस – राष्ट्रवादीने सुपारी दिल्याची टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे, बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते. लोकांना पैसे किंवा जमिनीच्या बदल्यात सुपारी दिली जाते, राज ठाकरेंना मात्र विधानसभेच्या २५ जागांच आमिष देत भाजप विरोधात सुपारी देण्यात आली आहे, अशी टीका काकडे यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला एकही उमेदवार न देता भाजप विरोधात वातावरण तापवले आहे. नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, पुणे आणि महाडमध्ये सभा घेत ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे,. आपल्या सभांमधून राज ठाकरे मोदी – शहांच्या निर्णयाची पोलखोल करत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय काकडे म्हणाले की, आघाडीने भाजपचा धसका घेत भाड्याने आणि सुपारी देन सुरु केल आहे. पैसे किंवा जमिन देण्याची सुपारी दिली जाते. मात्र राज ठाकरे यांना विधानसभेच्या २५ जागा देण्याचं आश्वासन दिले आहे, ठाकरे यांना गळाला लावल्याने ते मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल वायफट बोलत आहेत. राज ठाकरेंना त्यांचे उमेदवार विजयी करता आले नाहीत, ते भाजपचे उमेदवार काय पडणार, असा टोला काकडे यांनी लगावला आहे.