‘ते’ पत्र लिहणारा माझा हितचिंतक नाही-खा.काकडे

मोठ्या निर्णयात विचारत घेतलं जातं नसल्याच्या मुद्द्यात तथ्य नाही - काकडे

पुणे: माझ्या समर्थनार्थ भाजपच्या नगरसेवकांना ज्याने कोणी ते पत्र लिहिले आहे तो निश्चितच माझा हितचिंतक नाही असं सांगत निनावी पत्राच्या प्रकरणात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी कानावर हात ठेवले आहेत.सत्ता आल्यानंतर काकडे समर्थकांना ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान दिल जात असल्याचा आरोप करणारे एक निनावी पत्र अनेक नगरसेवकांना पोस्टाने पाठवण्यात आलं होतं त्यानंतर पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ पहायला मिळाली होती.

पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पालिकेत 162 पैकी तब्बल 98 नगरसेवक हे भाजपचे आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येण्यात ज्या नेत्याच्या हाथ आहे त्यांनाच पक्षात दुय्यम स्थान दिल जात असल्याने त्यांचे समर्थक नगरसेवक चांगलेच खवळल्याच दिसत आहे. ती व्यक्ती म्हणजे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे. काकडे समर्थकांना ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान दिल जात असल्याचा आरोप करणारे एक निनावी पत्र अनेक नगरसेवकांना पोस्टाने पाठवण्यात आलं होतं. संजय काकडे यांच्या हितचिंतकांनी पत्र लिहिले असल्याचा अंदाज वर्तवला जात होता,मात्र काकडे यांनी या मुद्याच खंडन केलं आहे.ज्यांच्या वर या पत्राच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहेत त्यांच्यापैकी बहुतांश नेत्यांशी माझे अत्यंत स्नेहाचे आणि मैत्रीपूर्ण संबध आहेत तसेच माझ्या समर्थनार्थ भाजपच्या नगरसेवकांना ज्याने कोणी ते पत्र लिहिले आहे तो निश्चितच माझा हितचिंतक नाही हे देखील स्पष्ट केलं आहे .काकडेंना कोणत्याच मोठ्या निर्णयात विचारत घेतलं जातं नसल्याच्या मुद्द्यात देखील तथ्य नसल्याचं काकडे यांनी म्हटले आहे

You might also like
Comments
Loading...