अशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी उभा राहणार – खा. संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना अंगावर दगड पडून दुर्दैवी अंत झालेल्या अशोक उंबरे यांच्या घरी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. अशोक उंबरे यांना आई नाहीत. त्यांचे वडील मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबियांवर या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबाचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले असून अशोक उंबरेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे.

या दुखःद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. एक शिवभक्त म्हणून त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. यापुढेही त्यांच्या कुटूंबियांची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मी स्विकारत आहे, असे भावनिक उद्गार संभाजीराजे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

अशोकचे मित्र भरतारी वारके यांना उंबरे कुटूंबाची सर्व जबाबदारी देण्यात आली असून या पुढे कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्वरीत संपर्क करण्यास सांगितले आहे.

तसेच मुख्यमंत्री साह्यनिधीतून २ लाख रुपये व वैयक्तिक मदत म्हणून १ लाख रुपये त्यांच्या कुटूंबीयांना खा. संभाजीराजे
देणार आहेत.

You might also like
Comments
Loading...