fbpx

कोल्हापूर- सांगली महापूर पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करा – खा. संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली. याचे कौतुक आहे, पण या निधीचा सुयोग्य वापर आणि वेगात काम करायच असेल तर, ‘कोल्हापूर- सांगली महापूर पुनर्वसन प्राधिकरण’ ची स्थापना करा, अशी मागणी खा. संभाजीराजे यांनी केली आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी ६ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती दिली. यामध्ये ४ हजार ७०० कोटी सांगली आणि कोल्हापूरसाठी तर २ हजार १०५ कोटी कोकण, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी असणार आहे. त्याच बरोबर पडलेली घरं पुन्हा बांधून देण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.

दरम्यान, स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी पूरग्रस्तांना ५ कोटी रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. माझ्या निधीतून ५ कोटी रुपये महापुराने प्रभावित क्षेत्रात खर्च करण्याचा संकल्प केला आहे. मला हे माहिती आहे, की रयतेच्या सेवेकरिता हे काहीही नाही. ही एक सुरुवात आहे. शिव शाहू विचारांसाठी आणि समाज सेवेसाठी माझं संपूर्ण जीवनच समर्पित आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या