कोल्हापूरसाठी वाट्टेल ती मदत करायला उतरलोय, खा संभाजीराजे धावले पूरग्रस्तांच्या मदतीला

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, कोल्हापूर, सातारा व सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सरकारसह अनेक सामाजिक संघटना नागरिकांच्या मदतीला पुढे सरसावल्या आहेत. खा. संभाजीराजे हे देखील आपल्या कार्यकर्त्यासह नागरिकांची मदत करत आहेत.

कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या बचाव तुकड्यासोबत संभाजीराजे बचावकार्य करत आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः बोललो असून त्यांना कोल्हापूरमधील पूरस्थितीची माहिती दिली, दोघांनीही पुराचा फटका बसलेल्या नगरीकांना सवर्तोपरी मदत करण्याचा शब्द दिल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर, सातारा व सांगलीत पाणीच पाणी

मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास 50 हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे.

भीमा नदी कोपली : २९ गावातल्या साडे सात हजारावर कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं

राज्यातल्या पूरस्थितीला सरकारचा भोंगळ कारभार जबाबदार – अजित पवार