‘महाराष्ट्र सरकारने मराठ्यांची बाजू मांडण्यासाठी सर्वोत्कृष्ट वकीलांची फौज उभा केली’

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला. पुढच्या अठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी सर्वोत्कृष्ट वकीलाची फौज उभा केली असल्याचा दावा खा. संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. आजरा येथे मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना भोसले यांनी हा दावा केला आहे.

या लढ्याचे यश हे सर्व समाजाचे आहे. सर्वांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी, आंदोलनातील सातत्य आणि महत्वाच म्हणजे संयम या सर्वांचा विजय म्हणजे मिळालेले आरक्षण. सनदशीर मार्गाने आपण सर्वांनी दिलेल्या लढ्याला यश मिळणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.मी या आरक्षणासाठी जे काही केल आहे ते माझे कर्तव्यच आहे. त्यामूळे आरक्षणासंबधी मी कोणत्याही प्रकारचा कुठेही सत्कार स्विकारणार नसून, शक्य असेल तिथे उपस्थित राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
मराठा क्रांती मोर्चाचा पहिला बळी ' मी ' ठरलो : आमदार भारत भालके
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रडत राऊतांमुळे यापुढे सामना बंद,बंद,बंद : मनसे
माझं कुणी काहीच ' वाकडं ' करू शकत नाही : संजय राऊत