खासदार संभाजीराजेंनी घडवून आणली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट

खासदार संभाजीराजे भोसले हे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फुट पाडत असल्याची राजकीय चर्चा

नाशिक: खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घडवून आणली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात उमेदवारीसाठी भागदौड पाहायल मिळत आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासदार संभाजी भोसले हे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फुट पाडत असल्याचे वारे वाहू लागले आहेत.

खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार शिवाजी सहाने आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट घडवून आणली. गेल्या निवडणुकीत सहाने निवडणूक लढले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव आणि सहाने यांना समसमान मते मिळाली होती.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघाची निवडणुक येत्या मे महिन्यात होत आहे. निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय हालचालींना वेग आला आहे.

एकीकडे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे आपल्याला उमेदवारी निश्‍चित असल्याचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे शिवाजी सहाने यांची मुख्यमंत्री भेट त्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.