‘मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल,न्यायदेवता न्याय करेल हीच आशा’

sambhaji raje

कोल्हापूर- मराठा आरक्षणप्रकरणी 27 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती संपुष्टात आणण्यासाठी राज्यातील सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या पीठाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती त्याच पीठा समोर ही सुनावणी पार पडणार आहे.

मराठा आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून दोन अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आले आहेत. न्या. एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पूर्णपीठासमोर २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगिती कायम राहणार की उठवली जाणार याचा निकाल समोर येण्याची अपेक्षा आहे. .

दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यात ते म्हणतात,येणाऱ्या 27 तारखेला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण संदर्भात सुनावणी होणार आहे. आरक्षणाला जी तात्पुरती स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली होती, तिचा पुनर्विचार करण्यासाठीची याचिका महाराष्ट्र शासन आणि समाजातील जागरूक बांधवांनी दाखल केली त्या संदर्भात सुनावणी होईल. ज्या न्यायमूर्तींनी स्थगिती दिली होती, पुन्हा त्यांच्याच बेंच समोर सुनावणी होणार आहे.

मला आशा आहे, की न्यायदेवता न्याय करेल. मराठा समाज बांधवांचा गेल्या 40 वर्षांचा लढा सार्थकी लागेल,अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर, राज्य शासनाकडून मागे ज्या चुका झाल्या किंवा ज्या काही उणिवा राहिल्या त्या पुन्हा होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.. नव्या जोमाने आणि पूर्ण शक्तीने न्यायालयाच्या समोर समाजाची बाजू मांडावी. संपूर्ण मराठा समाज याकामी आपल्या पाठीमागे उभा राहील असं त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-