fbpx

भाजप खासदार साक्षी महाराजांनी घेतली बलात्कारी आमदाराची भेट

sakshi_maharaj

सीतापूर : नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. साक्षी महाराज यांनी बुधवारी सीतापूरला येथे सामूहिक बलात्कार आणि हत्येतील आरोपी बांगरमऊचा आमदार कुलदीप सिंह सेंगरची जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीमुळे त्यांचे आभार मानने योग्य वाटले म्हणून तुरुंगात भेटायला आलो, असे त्यांनी सांगितले.

बुधवारी ईदनिमित्त सुट्टी होती. तरीही तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्यास दिले. यासाठी साक्षी महाराजांनी तुरुंग प्रशासनाचेही आभार मानले. आमदार खूप काळापासून तुरुंगात आहेत. त्यांची समस्या आणि सुविधांची काळजी मी करू शकत नाही. यामुळे केवळ भेटण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.