fbpx

बारामतीचे पाणी बंद करणाऱ्या रणजीतसिंहांनी घेतील उदयनजेंची भेट

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी खासदार झाल्याबद्दल भोसले यांनी निंबाळकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांचा दारूण पराभव केल्याने निंबाळकर यांची राज्यभर चर्चा सुरु आहे. यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,सांगोला,पंढरपूर,माळशिरस याभागातील जनतेला त्यांनी नीरा-देवधरचे बारामतीला देण्यात येणारे नियमबाह्य पाणी बंद करू असे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांबरोबर समन्वय राखत पूर्ण केले. बारामतीचे पाणी बंद करत राष्ट्रवादीला मोठा धक्का निंबाळकर यांनी दिला आहे.