लाचार रामराजेंनी ‘बारामती’ पुढे स्वाभिमान गहाण ठेवला ; रणजितसिंहांचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. लाचार रामराजेंनी ‘बारामती’पुढे स्वाभिमान गहाण ठेवलाय अशी टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.

निरा डाव्या कालव्यातून दुष्काळी भागाला पाणी रामराजेंमुळे जात नाहीये. लाचार रामराजेंनी ‘बारामती’पुढे आपला स्वाभिमान गहाण ठेवला आहे. असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यानंतर जयकुमार गोरे यांनी सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. रामराजेंनी मातीशी म्हणजे आईशी गद्दारी केलीये अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे बिनलग्नाची अवलाद आहेत अशी टीका केली होती.Loading…
Loading...