शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान

पाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी ?

टीम महाराष्ट्र देशा : ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानला अद्दल घडविल्याबद्दल आपण स्वत:ची पाट थोपटून घेत आहोत. दुसरीकडे पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. साखरेचे दर घसलेले असताना पाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी?, असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

साखरेची निर्यात करण्यापेक्षा पाकिस्तानची साखर आयात केली जाते आहे. सरकारला शेतकऱ्यांची किती काळजी आहे, हे या कृतीतूनच स्पष्ट होते असा उपरोधिक टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे. तसेच आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लाऊन शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान आहे. अशी टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘बळिराजाला दयेची नाही तर न्यायाची गरज आहे’ या विषयावर शेट्टी यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते.

You might also like
Comments
Loading...