तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप

तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप

Rajani Patil

औरंगाबाद : अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकार आणि उत्तर प्रदेश मधील योगी सरकार यांच्यात केवळ दाढीचा फरक आहे. दोन्ही सरकार समान अत्याचार करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार टीका केली.

उत्तर प्रदेश मध्ये सध्या असलेल्या योगी सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा घटना घडलेल्या असताना सांत्वन करण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींना अटक केली जाते, यावरुन तिथे किती मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू असल्याचा अंदाज येतो, असेही त्या म्हणाल्या.

भाजप नेहमी ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ अशा घोषणा देते, प्रत्यक्षात मात्र सर्वाधिक अत्याचार भाजप सरकारमध्ये होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘बहोत हुवा महिलाओपें अत्याचार, अब की बार…’ अशा घोषणा देतांना त्यांना लाच वाटत नाही का? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला. योगी सरकारच्या या अन्यायाविरोधात काँग्रेसच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असून या विरोधात काँग्रेसमधील प्रत्येक महिला आवाज उठवल्याशिवाय राहणार नसल्याचे खासदार पाटील म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या