Share

Rajan Vichare । ठाकरे गटाचा मोर्चा अडवला, खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी

Rajan Vichare । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजप (BJP) सोबत जात राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र तेव्हापासून सेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट तयार झाले. तसेच या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये सतत शाब्दिक चकमकी सुरु असतात. खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात राज्य शासनावर दडपशाहीचा आरोप करत आज नवी मुंबई पोलीस आयुक्ताल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चा काढला.

मात्र आयुक्तांना भेटण्यास खासदार राजन विचारे यांना मज्जाव करण्यात आल्याने आयुक्तालय प्रवेशद्वारावरील बंदोबस्ताला असणारे पोलीस आणि राजन विचारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे राजन विचारे संतापले. त्यांच्यात आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला.

ठाकरे गटाने बेलापूर येथे आधी सभा घेतली. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाकडे कूच केली. राजन विचारे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव आणि संजय पोतनीस सहभागी झाले होते. हा मोर्चा पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर आला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद झाला. थोड्या वेळानंतर पोलिसांनी त्यांना आत सोडले.

दरम्यान, दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या संरक्षणात कपात करण्यात आली आहे. यानंतर राजन विचारे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र व्यवहार केला आहे. सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक संरक्षणात कपात केली आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील, असं या पत्रात राजन विचारे यांनी नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Rajan Vichare । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजप (BJP) सोबत जात राज्यात नवं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics