भुमीगत गटार खोदकामाची कैफियत मांडली खासदारांसमोर

औरंगाबाद : पैठण शहरातील मौलाना साहेब दर्गा परिसरातुन होत असलेल्या भुमीगत गटारीच्या खोदकामाचा मुद्दा दर्गाच्या मुतवल्ली समशुन्नीसा बेगम यांनी जिल्ह्याचे खा.ईम्तियाज जलीली यांच्याकडे मांडला आहे.

या प्रकरणी आपण विभागीय आयुक्तांसह वक्फ मंडळाचे आधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन पर्यायी ठिकाणी खोदकामाची मागणी करणार असल्याचे अश्वासन या प्रसंगी बोलतांना खा. इम्तियाज जलील यांनी मुतवल्ली समशुन्नीसा बेगम यांना दिले आहे.

पैठण मध्ये सुमारे आठ वर्षापासुन शहरातील भुमीगत गटार योजना रखडली आहे, कामाच्या अंतीम टप्प्यात घाई गडबडी काम करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाचे अधिकारी मागचा पुढचा विचार न करता मिळेल त्या ठिकाणी खोदकामाचा सपाटा लावला आहे. आता तर त्यांनी मौलानासाहेब दर्गा कब्रस्तान उचकण्याचे काम सुरु केलेले आहे. याचा विरोध मुतवल्ली समशुन्नीसा बेगम यांनी केला असून या प्रकरणी जिल्हाधिकारी, वक्फ अधिकारी, उपविभागीय आधिकारी व आता खा.जलील यांना निवेदन दिले असून प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या