fbpx

शिवसेनेचे सत्तेत राहणे नुकसानीचेच- आढळराव पाटील

पुणे: भाजप सोबत सत्तेत राहणे शिवसेनेसाठी नुकसानीचेच असल्याच मत शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवले आहे. आम्ही सत्तेत नसल्यासारखेच आहोत. मी माझे वैयक्तिक मत पक्षाच्या हाय कंमाडला सांगितले आहे. सत्तेत असो किंवा नसो, फारसा फरक पडत नाही. कधीही सत्तेतून बाहेर पडावे. मी पक्षप्रमुखांना सांगितले आहे, की भाजपसोबत सत्तेत राहणे नुकसानीचेच आहे. शेवटी पक्षप्रमुख निर्णय घेतील, असं मत आढळराव पाटील यांनी व्यक्त केल आहे.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भाजपच्या जवळकीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात येत होत्या त्यानंतर आलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.