कोरोनावर मात करत खासदार नवनीत राणा पोहचल्या संसदेत 

navanit rana

अमरावती : लोकसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार वेतन-भत्ते व निवृत्ती वेतन सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना एका अत्यंत महत्वाचा मुद्दा अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी उपस्थित केला व सडेतोडपणे सभागृहात आपले म्हणणे मांडले. संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यासाठी खासदार वेतनातून व इतर भत्ते तसेच निवृत्ती वेतन यामधून 30 टक्के कपात करण्याचा हा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या जीवघेण्या आजारावर मात करून  संसदेच्या अधिवेशनाला त्यांनी हजेरी लावली.

या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलतांना खासदार नवनीत रवी राणा यांनी पीठासीन सभापतींना विनंती केली की खासदार म्हणून आपल्याला मिळणारे वेतन व इतर भत्ते पूर्ण कपात करून कोविडसाठी वापरा परंतु, मतदार संघाचे विकासासाठी आम्हाला मिळणार वार्षिक 5 कोटी रुपयांचा खासदार निधी मात्र पूर्ण द्या. कारण, हा निधी स्थानिक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी, रुग्णवाहिका घेण्यासाठी व मतदार संघातील इतर आवश्यक विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो.

सद्यस्थितीमध्ये जिल्हाधिकारी सांगतात की, केंद्र शासनाचे नवीन निर्देश व मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सध्या खासदार निधीचा वापर करता येणार नाही. त्यामूळे मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडविताना अडचणी निर्माण होत आहेत व लोकांची गैरसोय होत आहे.

इतर खर्चांमध्ये कपात करून स्थानिक लोकांच्या सेवेसाठी पूर्ण खासदार निधी वापरण्याची मुभा मिळावी, अशी आग्रही मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत केली. सोबतच या महामारीत आपण आपला खासदारकीचा संपूर्ण पगार देण्यासाठी तयार आहोत व इतर खासदारांनी सुद्धा आपला पगार द्यावा अशी सूचनाही त्यांनी सभागृहात केली.

महत्वाच्या बातम्या:-