पदर खोचून नवनीत राणा उतरल्या पेरणी करायला शेतात…

navneet rana

अमरावती : राज्यात सर्वदूर मान्सुनच चांगल आगमन झाल आहे. त्यामुळे शेतकरी देखील पेरणीच्या तयारीला लागला आहे. पण शेतकरीच नाही तर खुद्द खासदार देखील पेरणीला लागले आहेत. विदर्भातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील एका शेतात जाऊन शेतकऱ्यांना पेरणी करण्याच्या कामात मदत केली आहे. रस्ता ओलांडून शेत तूडवत बांधावर जात त्यांनी पेरणी करणाऱ्या बैल जोडीची आणि शेतकऱ्यांचे औक्षण करून थेट कासरा हातात घेत पेरणी केली.

देश आणि राज्य संकटात सापडला असताना आपल्या बळीराजाने कष्ट करत कोणालाही उपाशी राहू न देण्यासाठी विडा उचलला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पेरणी करायला शेतात आल्याचे खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी शेतमजूर महिला व शेतकऱ्यांसोबत शेतात काही वेळ पेरणी करून शेती विषयक कामे, अडिअडचणी जावून घेतल्या अन् पुढील दौऱ्याकरिता रवाना झाल्या.

बच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश

दरम्यान, खासदारीणबाई नवनीत राणा स्वतः शेतकऱ्याच्या शेतात पेरणी करत असल्याचे पाहून बघणाऱ्यांची मोठी गर्दी केली होती. मान्सूनच्या पावसाने आगमन केले असल्याने शेतकऱ्याची सध्या पेरणीची लगबग आहे. राज्यातील शेतकरी पहिले कोरोनाच्या संकटात असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुकवरुन एक भावुक व्हिडीओ शेअर केला होता. स्वत:च्या शेतातून घरी येत असताना वाटेत शेतकऱ्याचे एक कुटुंब शेतात पेरणी करत असताना त्यांना दिसले. त्या ठिकाणाहून गाडी पुढे गेली होती. मात्र संभाजीराजांना रहावलं नाही. त्यांनी गाडी वळवली आणि त्या शेतात गेले. सुरुवातील त्यांना संकोच वाटल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. मात्र ते पुढे गेले व त्यांनी शेतकऱ्यासह तिफन हाती घेतलं. हा अनुभव खूप समृद्ध करणारा होता, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होत.

मुंबईत 950 हून अधिक कोरोना मृत्यू का दडवले? फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Posted by Navneet Ravi Rana on Monday, June 15, 2020