‘मुख्यमंत्र्यांना देवीने सुबुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर मंदिरे सुरू व्हावीत’

navneet rana kaur

अमरावती- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले होते यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वच यंत्रणा काम करत आहेत. दुकानं,मॉल,बार,सार्वजनिक वाहतूक राज्यात सुरु झाली आहे. मात्र प्रार्थनास्थळे बंद असल्याने मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे.

भाजपनेते आणि विविध धार्मिक संघटना प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत आग्रही असताना आता खासदार नवनीत राणा कौर यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर तोफ डागली. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘मंदिरा’लयच सुरू करायचे होते. मात्र, ‘म’ वरचा अनुस्वार चुकल्याने राज्यातील मदिरालय सुरू झाली’ अशी खोचक टीका अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.

न्यूज18 लोकमतशी बातचीत करत असताना नवनीत राणा यांनी ही टीका केली आहे.’राज्यातील रेस्टॉरंट, बार, दारूची दुकाने सुरू झाली आहे. मात्र, राज्यातील धार्मिक स्थळं मात्र अजूनही बंदच आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात महिला दहा दिवस उपवास करतात. देवीचे दर्शन घेतात, मात्र, मंदिरं बंद असल्यामुळे आता महिलांना देव दर्शनापासून मुकावं लागणार असल्याने नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांना देवीने सुबुद्धी द्यावी आणि लवकरच मंदिर सुरू व्हावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-