खासदार नवनीत राणा यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे रेमडेसिवीरची मागणी

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्यासंदर्भात मागणी केली आहे. राज्यात कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. त्यामुळे खासदार राणा यांनी थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्याला प्रतिदिन ३००० रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा करण्याची मागणी केली. यामध्ये त्यांनी जिल्हात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शनची संख्या आणि होत असलेला पुरवठा या बाबतची संख्या यांचाही उल्लेख केला आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे रवनीत राणा यांनी या आधी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केले होते. आता तर त्यांनी थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच औषधींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या