खा. कोल्हे केवळ शिरुर पूरते मर्यादित नाहीत, त्यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे : अजित पवार

dr amol kolhe

टीम महाराष्ट्र देशा : शिरूरचे नवनिर्वाचित खा. डॉ. अमोल कोल्हे दिल्लीत उत्तम करत असतानाच मतदारसंघात कार्यकर्त्यांनी आरडाओरडा सुरु केला आहे. मात्र यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाच चांगले सुनावले आहे.

लोकसभा निवडणूका झाल्यापासून खा. कोल्हे भोसरी मतदारसंघात आलेचं नाही अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली होती. यावर अजित पवार म्हणाले की, खा. कोल्हे आता शिरूरपुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी आहेत. त्यामुळे केवळ भोसरी-भोसरी करू नका. ते भोसरी किंवा शिरूरपुरते मर्यादित नाहीत. तसेच आमदार-खासदार होऊन दारोदारी फिरायचे असते की पान टपऱ्यांवर गप्पा मारायच्या असतात? कोल्हे दिल्लीत खासदार म्हणून चांगले काम करत आहेत, असे देखील पवार म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. अमोल कोल्हे यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. निवडणूक काळात त्यांना शरद पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्याबरोबरीने राज्यभर प्रचार करणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेला खा. कोल्हे राष्ट्रवादी पक्षाकडून महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसणार आहेत.