अब्दुल सत्तारांच्या मागणीवर खासदार जलील यांची टिका

औरंगाबाद : कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली वाढ पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. यामध्ये राज्यातील १० हजार १२७ पदे आहेत. ही पदे भरल्यास आरोग्य विभागावरील ताण कमी होईल, आणि कारोना रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असे सत्तार यांनी म्हटले आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांच्या मागणीवर खासदार जलील यांनी टीका केली आहे.
या संदर्भात खासदार जलील म्हणाले की, हीच मागणी जर लवकर करण्यात आली असती तर आपण राज्यातील अनेकांचे प्राण वाचवू शकलो असतो.

राज्यात सध्या कोरोना रुग्ण संख्येबरोबरच कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात काही नागरिकांना पुरेशी आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. यातील काही रुग्ण तर ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडले आहेत.

मात्र, गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णासाठी किंवा एकूण आरोग्य सुविधा वाढाव्यात यासाठी राज्य सरकारच्या वतीने कोणतेही ठोस उपाय करण्यात आलेले नाही. आता रुग्ण संख्या वाढत असताना भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी आधीच झाली असती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती झाली असती, तर आज आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकलो असतो, असे खासदार जलील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :