औरंगाबादमधील जनता कर्फ्यू वाढणार का ? खासदार इम्तियाज जलील म्हणतात…

imtiyaj jaleel

औरंगाबाद- शहरात १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु लावण्यात आलेला आहे. याला नागरीकांकडून आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. या जनता कर्फ्यु मध्ये तुर्तास तरी वाढ नाही. काय जो निर्णय घ्यायचा आहे. तो पुढील बैठकीत होईल सध्या तरी यावर चर्चा झाली नाही. असे बैठकीनंतर खासदार इम्तियाज जलील आणि भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. तसेच माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरै यांनी सुद्धा लॉकडाऊन वाढणार नसल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, खासदार इम्तियाज जलील, खासदार डॉ. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अंबादास दानवे, सतिष चव्हाण, प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

यावेळी इम्तियाज जलील माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, शहरात १० जुलै पासून जनता कर्फ्यु लावण्यात आलेला आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतोय. दररोज किती व कशा टेस्ट केल्या जात आहे. पुढे काय करायचे आहे यावस सविस्तर चर्चा झाली. दुध विक्रेत्यांना मुद्दा उपस्थिती झाला. अनेकांकडे दुध आहे मात्र ते विक्री करण्यात अडचणी येत आहे. दुध विक्रेत्यांना यामध्ये सवलत द्यायला हवी. तसेच उद्योगांचा मुद्दा उपस्थितीत झाला.

राज्यात ज्या शहरात लॉकडाऊन आहे तेथे उद्योग सुरु आहे मात्र आपल्याकडे उद्योगांच्या अडचणी आहे. शहरात क्वारंटाईनसाठी हॉटेलवर महापालिका आयुक्तांनी माहिती दिली. सध्या चार हॉटेल मध्ये क्वारंटाईनची व्यवस्था आहे. सध्या तरी लॉकडाऊन वाढविण्यावर चर्चा झालेली नाही. जतना कर्फ्युला रिस्पॉन्स कसा मिळतो आहे. केसेस किती वाढत आहे यावर पुढील बैठकीत निर्णय होईल.

डॉ. भागवत कराड म्हणाले की, बैठकीत जनता कर्फ्यवर चर्चा झाली. सध्या अडीच हजार टेस्टींग केल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच औषधी संबंधी सुद्धा चर्चा करण्यात आली. आता लॉकडाऊन मध्ये वाढ केली जाणार नाही असे कराड यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

अशोक गेहलोत यांच्या अडचणी सुरुच,निकटवर्तीय उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाचे छापे

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर

‘भाजपा’त प्रवेश करणार नाही; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा

कॉंग्रेसला मोठा धक्का,आमदारकीचा राजीनामा देत ‘या’ बाहुबली नेत्याने केला भाजपात प्रवेश