खा. इम्तियाज जलील म्हणाले, ‘ती’ पोस्ट माझी नाहीच, भाजप आ. सावेंनाच सुनावले खडे बोल

MP Imtiaz Jalil says, That post is not mine, False Claim BJP MLA Atul Save

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक नेतेमंडळी सोशल मीडियावर शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट टाकत असतात. परंतु खा. इम्तियाज जलील यांच्या नावाने असलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून भारताचा चुकीचा नकाशा असलेली पोस्ट करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार अतुल सावे यांनी केला आहे. भाजप आ. अतुल सावे यांनी इन्स्टा पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. खासदारांना देशाच्या सीमा माहिती नाहीत का की त्यांनी जाणूनबुजून हे केले आहे? असा सवाल सावेंनी त्यांना विचारला आहे.

खा. इम्तियाज जलील यांचे स्पष्टीकरण

यावर ‘महाराष्ट्र देशा’ने खा. इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही पोस्ट केल्याचे नाकारले आहे. खा. जलील म्हणाले की, मी इन्स्टाग्राम वापरतच नाही. मी अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही. माझ्या नावाने कोणीही अकाउंट काढून असे करू शकते. भाजपला आता काही काम राहिलेले नाही. नवा वाद निर्माण करण्यासाठी भाजपकडून असे प्रयत्न नेहमीच होत असतात. त्यांनीच हे अकाउंट तयार केले नसेल कशावरून?

पुढे खासदार जलील म्हणाले की, ”भाजपने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे, दिल्लीत होणारा हिंसाचार, देशातील ज्वलंत प्रश्न याकडेही त्यांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी गप्प आहेत, तिकडे चीन घुसखोरी करतोय, हे प्रश्न सोडून लक्ष वळवण्यासाठी भाजपकडून मुद्दामहून नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.”

महत्वाच्या बातम्या