खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन

औरंगाबाद :  औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जलील यांनी स्वत: ट्विट करून आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. रशिदपूरा येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पाच दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील महापालिका निवडणुकीत त्यांचा प्रचार दौरा होता. तो आटोपून ते औरंगाबाद शहरात दाखल झाले होते. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरातच होते. त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांच्या कोरोणा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. तसेच,  संपर्कात आलेल्यांनी कोरोनाच चाचणी करून घ्यावी, असे आवाहन खासदार जलील यांनी  केले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या राज्यातील बड्या नेत्यांमध्ये आता औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या