लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

girish bapat ajit pawar

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे या व्हायरसशी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय अजित पवार यांच्या बैठकीनंतर घेण्यात आला. पुणे शहरात अत्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. 13 जुलै म्हणजे सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यामध्ये दूध,औषध यांचा समावेश आहे. ज्या वस्तू लागत आहेत, त्या खरेदी करुन घ्या,’ असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.

दरम्यान आता या मुद्द्यावरून राजकारण सुरु झालं आहे.  पुणे व्यापारी संघानंतर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.news 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महाराजांनी मनं जिंकलं : कोरोनातून बरे होताच दान केला प्लाझ्मा

‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’

‘बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही’