fbpx

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरतायेत पर्यावरण दूत..५८,००० हजार वृक्षांचे रोपण

ठाणे/ टीम महाराष्ट्र देशा :  जागतिक वाढत्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला तोंड द्यायचे असेल तर वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे अतिशय महत्वाचे आहे. पर्यावरण संतुलित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून यादृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी काल अंबरनाथ मधील खुंटवली येथे जवळपास ५८,००० झाडांचे रोपन केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, नारडेको, वन विभाग, अंबरनाथ नगरपालिका आदी विविध संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

मागील वर्षी देखील मांगरुळ (ता. अंबरनाथ) इथे खासदारांच्या पुढाकाराने ८५ एकर जागेवर तब्बल १ लाख वृक्ष लावले होते. समाजकंटकांनी ते जाळून टाकण्याचा घाणेरडा प्रकार करून सुद्धा तेथील वृक्ष तग धरून उभे राहिले आहेत. मूलभूत सोयी-सुविधा ,रस्ते, पाणी या गोष्टी गरजेच्या आहेतच परंतु पर्यायवरणाचा वेगाने होणारा ऱ्हास रोखण्यासाठी प्रयत्न करणे देखील महत्वाचं आहे. त्या दृष्टीने खासदारांनी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे ते खरे पर्यावरण दूत ठरत आहेत.

या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, कल्याणचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याण-डोंबिवली महागरपालिकेचे सभागृह नेते श्रेयश समेळ, तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

सिमेंट काँक्रीटच्या जंगलात उबलेल्या समाजाला पर्यावरणाच्या दिशा उघड्या करण्यासाठी खासदार नेहमीच प्रयत्नशील असतात. विकासासोबत पर्यावरणाचे संवर्धन देखील महत्वाचे असल्याने त्यांचे हे पाऊल नक्कीच महत्वपूर्ण आहे.
– पालकमंत्री एकनाथ शिंदे

मतदारसंघांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी यांसारख्या महत्वाच्या गोष्टींसोबत पर्यावरणसंवर्धक मतदारसंघ घडविण्यास सदैव तत्पर आहे.
– खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

पर्यावरणात झपाट्याने होणारा बदल मनुष्यप्राण्यास घातक असून सुद्धा त्याप्रमाणात त्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाही. परंतु आमचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे त्या बाबतीत ही अतिशय महत्वाचे पाऊल उचलत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. असेच कार्यतत्पर खासदार जर सगळीकडे असतील तर पृथ्वीचे नंदनवन होणे दूर नाही.
– अध्यक्ष, एक्का फाऊंडेशन
(सहभागी संस्था)

शिवसेनेच्या वतीने ठाण्यात ‘महाआरोग्य यज्ञ’; गरजूंना मिळणार मोफत उपचार

2 Comments

Click here to post a comment