रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या – खासदार अमोल कोल्हे

dr amol kolhe

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत ही आग्रही मागणी केली आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाष्य केलं.

त्यावेळी 17 व्या शतकात जशी रायगड राजधानी होती तशीच ती आताही करावी, अशी आग्रही मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली. इतकेच नव्हे तर, स्टॅच्यू ऑफ युनिटीप्रमाणे या वास्तू आपण जपायला हव्या. त्यांचं आपण संवर्धन करायला हवं, असेही कोल्हे यांनी म्हंटले.Loading…
Loading...